महात्मा फुले जयंती निमित सांगोला शहरामध्ये भव्य मिरवणूक व पदयाञा
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 196 व्या जयंतीनिमित्त उद्या सकाळी ठीक 9.30 वाजता सांगोला शहरामध्ये भव्य मिरवणूक व शोभायाञा निघणार आहे. तसेच शहरातील राष्ट्रीय महापुरूषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी पदयाञा काढण्यात येणार आहे.
मंगळवार दिनांक 11 एप्रिल रोजी सकाळी ठिक 8.30 वाजता सामुदायिक पुष्पहार अर्पण व विविध क्षेत्रात नाव लौकिक केलेल्या मान्यवरांचा. जयंती मंडळाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गुण गौरव करण्यात येणार आहे.
तसेच ठीक 9.30 वाजता महात्मा फुले यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणुक व शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तरी तमाम महात्मा फुले प्रेमींनी महामानव क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आव्हान महात्मा फुले जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे


No comments:
Post a Comment