अज्ञात व्यक्तीने सासुरवाडीला आलेल्या जावायाची कार पेटवली,सात लाखांचे नुकसान
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला - अज्ञात कोणीतरी व्यक्तीने सासुरवाडीला आलेल्या जावयाची कार पेटवून दिली या आगीत कारचे जळून सुमारे ७ लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना ८ मार्च रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास मार्डी ता उत्तर सोलापूर येथील गावातील नागनाथ मंदिराजवळ घडली. याबाबत, ज्ञानेश्वर भीमराव लिगाडे रा. सांगोला जि. सोलापूर यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सांगोला येथील अरुण उर्फ ज्ञानेश्वर लिगाडे हे कुंटूंबास मंगळवार ७ मार्च रोजी दुपारी अडीच सुमारास एम एच -४५-एक्यू-४०२५ या कारमधून मार्डी ता.उत्तर सोलापूर येथील सासरे सुनील मुडके यांच्या घरी आले होते. दरम्यान दुसऱ्या दिवशी ८ मार्च रोजी त्यांनी कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शन केले.देवदर्शन करून परत आल्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास सदर कार सुनिल मुडके यांच्या घराचे बाजुस असलेल्या मोकळ्या जागेत लावली होती. रात्री जेवण झाल्यावर सर्वजण घरात झोपले होते हीच संधी साधून अज्ञात कोणीतरी व्यक्तीने रात्री ११:४५ च्या सुमारास त्याची कार पेटवली. गावातील आबा सुरवसे यांनी सदरची घटनेची माहिती सुनील मुंडके यांना दिली त्यांनी झोपेतून उठून घरातून बाहेर येवून पाहिले असता गाडी पेटलेल्या अवस्थेत निदर्शनास आली. नातेवाईकांसह इतरांच्या मदतीने त्यांनी पेटलेल्या गाडीवर पाणी फवारून गाडी विजवली.या आगीत कारचे जळुन सुमारे ७ लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. तपास एएसआय श्रीमती शारदा घोळवे करीत आहेत.


No comments:
Post a Comment