चक्क!!! सांगोला येथील आमदार यांच्या कार्यक्रमाला नागरिकांनी फिरवली पाठ....
पहा.... सविस्तर....
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
काय झाडी... काय डोंगार... काय हॉटेल... एकदम ओके... या वाक्यामुळे फेमस झालेले सांगोला तालुक्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी नागरिकांच्या अडी अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्याकरिता सांगोला तालुक्यातील सर्व शासकीय अधिकाऱ्यांसमवेत "आमदार आपल्या दारी" हा शासकीय "गाव भेट" दौरा नुकताच संपन्न झाला आहे. या गाव भेट दौऱ्यामध्ये अनेक गावांतील नागरिकांचा प्रतिसाद दिसून आला नाही. काही गावातील नागरिकांनी तसेच बापूंच्याच निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यातील सर्वच गावांमध्ये गाव भेट दौरा आयोजित करण्यात आला होता.या गाव भेट दौऱ्यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून आली.
आमदार शहाजीबापू पाटील यांची निवडणूक आली की, घरच्या भाकरी खाऊन दिवसभर उन्हातानात यांचा प्रचार करणारे व २४ तास आपण शहाजीबापू पाटील यांचे सच्चे व निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे ठासून सांगणारे असंख्य कार्यकर्ते संपूर्ण तालुक्यात पाहायला मिळतात. तालुक्याचे राजकारण करत असताना शहाजीबापू पाटील यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप झाले. त्यांच्यावर आलेल्या प्रत्येक संकटात कार्यकर्त्यांनी ढाल बनून आपल्या नेत्याचे रक्षण केले.
परंतु २०१९ रोजी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर अचानक शहाजीबापू पाटील यांना आपल्या जुन्या नव्या निस्वार्थी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचा जणू विसर पडल्याप्रमाणे ते वागू लागल्याचे बोलले जात आहे. बापूंच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा आणि बापूच्या राजकीय वाटचालीत नेहमी त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत राहणारा निस्वार्थी कार्यकर्ता जपणे आजच्या घडीला महत्वाचे ठरणार आहे. तसेच या गाव भेट दौऱ्यातून नेमके काय संपन्न होणार तो येणारा काळच ठरवेल असे सुजाण नागरिकांमधून बोलले जात आहे.


आदित्य ठाकरें नी सांगोला तून विधानसभा लढवावी
ReplyDelete