कोळा गावात हायमास्ट दिव्याच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार
सांगोला प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील कोळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत हायमास्ट दिव्यापोटी दिवे खरेदी व त्याची दुरुस्ती सन २०२० व २१ सालामध्ये यामध्ये मोठा गफला झाला असुन लाखो रुपये यामध्ये लाटले गेले असून एकप्रकारे भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता असुन बोगस कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई करावी यापुढील काळात कोणतेही काम देऊ नये अशी मागणी सांगोला पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी कोळा गावचे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक समाधान बोबडे यांनी केली आहे.
पुढे बोलताना सामाजिक कार्यकर्ते समाधान बोबडे म्हणाले कोळा व परिसरात गेल्या काही दिवसापासून वर्षापासून लाईटची दिवे लावण्यात आले बऱ्यापैकी बंद पडले आहेत निकृष्ट दर्जाचे लावले गेले आहेत यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार झाला असल्याचे निदर्शनास येत असून वाड्या वस्त्यावर जे हाय हायमास्ट दिवे बल्ब दिवे बसविले ते दिवे किती दिवस चालले ते दिवे वारंटी गॅरंटीचे होते का याची कसून चौकशी झाली पाहिजे. ते दिवे परत दुरुस्त केले का? तसा करार नामा करून दिला होता का ?अन बसवलेल्या दिव्याचे स्पेअर पार्ट काढून चोरी करून दुसऱ्या ठिकाणी विकतो का याची कोणी चौकशी केली का मागील पाच वर्षापासून कोणतीही वीज बोर्डाची परवानगी न घेता नुसते हायमास्ट चे पोल उभे करून त्या पोल वरती बोगस साहित्य वापरून लाखो रुपये हडप केलेले आहेत. पंचायत समितीने चौकशी समिती नेमावी व गावातील पतदिव्यांची कामे आणि हायमास्ट निकृष्ट लावले गेले आहेत ग्रामपंचायत पाठीशी घालत आहे हे किती दिवस चालणार माझ्या माहितीनुसार १४ वा वित्त आयोग व १५ वित्त आयोग यातून जवळपास सन २०२० ते २०२१ व २२ कालावधीमध्ये २५ ते ३० लाख रुपये खर्च केल्याचे अंदाजे समजते आज रोजी मात्र गाव अंधारातच आहे. संपूर्ण प्रकरणाची तपासणी चौकशी होणे गरजेचे आहे यापुढे बोगस कामे करू नयेत असा खणखणीत इशारा समाधान बोबडे यांनी दिला आहे.
चौकट...
कोळा ग्रामपंचायत हद्दीत अनेक हायमास्ट दिवे बसविले आहेत निकृष्ट दर्जाचे लावले असल्याने काही दिवे बंद अवस्थेत असून संबंधित ठेकेदार वर कारवाई व्हावी...
मा श्री समाधान आलदर (बोबडे)
समाजसेवक कोळा


No comments:
Post a Comment