Recent Tube

Breaking

Saturday, January 17, 2026

अॕड.शंकर‌‌ सरगर यांनी कार्यकर्त्यांना आदर्श घालून दिला -भाई चंद्रकांत सरतापे



अॕड.शंकर‌‌ सरगर यांनी कार्यकर्त्यांना आदर्श घालून दिला -भाई चंद्रकांत सरतापे


 रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


  सांगोला तालुक्यातील प्रसिद्धी विधीतज्ञ व लोटेवाडी गावचे रहिवाशी अॕड.भाई शंकर सरगर हे लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचे विश्वासू सहकारी असुन..ते महुद जिल्हा परिषद गटातुन जिल्हा परिषदेसाठी प्रबळ दावेदार होते महुद गटातील प्रत्येक गावामध्ये त्यांना जनसंपर्क आहे व कार्यकर्ते त्यांना भेटीदरम्यान चांगला प्रतिसाद देत होते ..विधानसभा निवडणुकीतील घाणाघाती भाषणांने सरगर वकीलांची गावोगावी एक तरुण व तडफदार शेकापक्षाचा युवा नेता म्हणून ओळख निर्माण झाली असल्याने ते उमेदवारीसाठी योग्य असे उमेदवार होते..

  निवडणुक ही कोणा तरी एकालाच लढवायची असल्याने व एकाला माघार घ्यावी लागणार असल्याने तसेच राजकीय समीकरणांचा विचार करुन अॕड शंकर सरगर साहेब यांनी स्वतःहुन माघार घेत असल्याचे जाहीर केले.

  कित्येकांना निवडणुकीतुन माघार घ्यावी लागते काही घेत असतात परंतु मा.सरगर वकील साहेबांनी फक्त निवडणुकीतुन माघार घेतली नाही तर मी महुद जिल्हा परिषद गटात गावोगावी तसेच प्रत्येक वाड्या वस्त्यावर जाऊन भाई.बाळासाहेब ढाळे व पंचायत समीतीचे दोंन्ही उमेदवार यांचा दिवसरात्र प्रचार करुन त्यांना विजय करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले...ते म्हणाले आपणास स्व.आबासांहेबांचे विचार घेऊन काम करायचे आहे व लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायचे असल्याचे वकील साहेबांनी सांगीतले

   तसेच पुढे बोलताना वकील पक्षात काम करीत असताना एखाद्या पदावर काम करण्यासाठीची मागणी करणे काही गैर नाही परंतु मागणी करताना तुटेपर्यंत मागणी करणे योग्य नाही हे वकील साहेबांनी दाखवून दिले आहे.आहो माघारी घेऊन सुध्दा त्यांच्या चेहऱ्यावर किंचीतही नाराजी दिसत नव्हती मुळात ते हसत मुख चेहऱ्याचे आहेत परंतु माघार घेतली तरीही ते खुष दिसत होते आसपास चार्चा करताना कोणाजवळ नकारात्मक बोलताना दिसत नव्हते त्यांच्या बोलण्यातुंन एकच गोष्ट जाणवत होती  ती म्हणजे महूद जिल्हा परिषद व चिकमहुद व महुद पंचायत समिती गणावर  लाल बावटा फडकणे यासाठी ते अंत्यत संवेधनशिल व आत्मविश्वासाने बोलातान संपर्क तालुक्यातील लोकांनी काल सुत गीरणी वर पाहीले.असो एका निवडणुकीतील माघार म्हणजे पुढील राजकीय झेप घेण्यासाठीची ही माघार आहे.

 शेतकरी कामगार पक्षाच्या व पुरोगामी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांना अॕड शंकर सरगर साहेब यांचे काम त्यांचे विचार व‌ पक्षाप्रती असलेली निष्ठा पक्षासाठी त्याग करण्याची तयारी तसेच  लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या वर आसलेला विश्वास या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत.

No comments:

Post a Comment