Recent Tube

Breaking

Monday, November 3, 2025

जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार ..!



जिल्ह्यातील नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकणार ..!



भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिला विश्वास



सांगोला (प्रतिनिधी): आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असून, भारतीय जनता पक्षान जोरदार तयारी सुरू केली आहे. “या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी व्यक्त केला आहे. 

     भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावा हाच आमचा अजेंडा आहे, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी स्पष्ट केले आहे.  

      भाजपला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून एकदिलाने काम करावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे. ‘‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकवायचा आहे. नवे-जुने कार्यकर्ते जोडून नवीन नेतृत्व उभे करायचे आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यामुळे त्यांना न्याय दिला जाईल. गेली अनेक वर्षे मतदारांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

     भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या तयारीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. स्थानिक स्तरावर पक्षाचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी मंडळांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून आगामी कार्ययोजना निश्चित करण्यात आली. बैठकीदरम्यान जनतेच्या अपेक्षा, स्थानिक विकासाच्या संधी आणि सामाजिक बांधिलकी या तीनही विषयांवर सखोल विचारमंथन झाले. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा मजबूत स्तंभ असल्याचे अधोरेखित करत, जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचवणे आणि विकासाची गती वाढवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. एकजुटीने, नियोजनबद्ध आणि जबाबदारीपूर्ण कार्यपद्धतीद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष यांचा भक्कम विजय होईल हा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिला.

No comments:

Post a Comment