Recent Tube

Breaking

Thursday, January 1, 2026

वाकी शिवणे गावचे भिमराव पिराजी होवाळ यांचे वृद्धापकाळाने निधन.



वाकी (शिवणे) गावचे भिमराव पिराजी होवाळ यांचे वृद्धापकाळाने निधन.


सांगोला तालुक्यातील वाकी (शिवणे) गावचे रहिवासी भिमराव पिराजी होवाळ यांचे गुरुवार दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 97 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात 2 मुले, 4 मुली, सुना नातवंडे व जावई असा मोठा परिवार आहे. 

भिमराव पिराजी होवाळ यांच्यावरती वाकी (शिवणे) स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवार दिनांक 3/1/2026 रोजी सकाळी 7.30 वाजता वाकी (शिवणे) स्मशानभूमीत करण्यात येणार आहे असे त्यांच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले.  

 भिमराव पिराजी होवाळ यांच्या निधनामुळे वाकी गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

भिमराव पिराजी होवाळ हे वंचित बहुजन आघाडीचे तालुका सचिव व महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष दिपक होवाळ यांचे वडील होते.

No comments:

Post a Comment