Recent Tube

Breaking

Saturday, December 27, 2025

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यास यश ; सांगोला तालुक्याच्या सिंचनासाठी ७० कोटी रुपये मंजूर




आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यास यश ; सांगोला तालुक्याच्या सिंचनासाठी ७० कोटी रुपये मंजूर


टेंभू उपसा सिंचन योजनेतून वाढीव पाईपलाईन व लाभक्षेत्र विकास कामांना मंजुरी


सांगोला(तालुका प्रतिनिधी) — सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर न्याय मिळाला आहे. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत प्रलंबित असलेल्या पाइपलाईन आणि कालवा विकास कामांसाठी तब्बल ७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या मंजूर निधीतून बुध्देहाळ भरण वितरिकेसाठी  48 कोटी 35 लाख 89 हजार व सांगोला कालवा किमी 1 ते 50 लाभक्षेत्र विकास कामांसाठी  21 कोटी 27 लाख 68 हजार असे एकूण सुमारे ७० कोटींचा महत्त्वाचा निधी सांगोला तालुक्यातील  सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. अधीक्षक अभियंता, सांगली पाटबंधारे मंडळ, सांगली यांनी प्रापण सूची सन २०२५-२६ मध्ये समाविष्ट करण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावानुसार निधीची तरतूद करण्यात आली आहे.


या निधी द्वारे बांधकाम व पाइपलाईन टप्प्यांची कामे करण्यात येणार आहेत. यापूर्वी या कामांच्या मंजुरी प्रस्तावांना वारंवार विलंब होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आमदार देशमुख यांनी  ही मागणी ठामपणे मांडत संबंधित विभागांशी सातत्याने पाठपुरावा केला.


: टेंभू उपसा सिंचन प्रकल्पांतर्गत सांगोला कालवा किमी १ ते ५० परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार वाढीव पाईपलाईन व लाभक्षेत्र विकास कामांच्या संदर्भात   सुमारे  ७० कोटींचा महत्त्वाचा निधी सांगोला परिसरातील सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. या कामांमुळे कडलास, कोळे, सोनंद, गौडवाडी तसेच परिसरातील इतर गावांना नियमित सिंचन मिळून शेतीचे क्षेत्र आणि उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होणार आहे. शेतकऱ्यांच्या पाण्याच्या गरजा पूर्ण होऊन दुष्काळी परिस्थितीतही दिलासा मिळणार आहे.कालव्यांच्या विस्तारीकरणामुळे केवळ शेतीपुरतेच नव्हे, तर पिकांची उत्पादनक्षमताही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या पाणीअभावी उभ्या राहिलेल्या अनेक समस्यांना यामुळे मोठा हातभार लागणार आहे.


सांगोला तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन प्रकल्पासाठी तब्बल ७० कोटींचा निधी मंजूर करून घेण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे शेतकरी बांधवांकडून   अभिनंदन होत आहे.शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन पाणीप्रश्नाला दिलासा मिळवून देण्यासाठी त्यांनी दाखवलेली बांधिलकी व प्रामाणिक भूमिका कौतुकास्पद असून त्यांच्या प्रयत्नांमुळे कालवा व पाइपलाईन कामांना गती मिळून मोठ्या प्रमाणावर शेती क्षेत्राला लाभ होणार आहे.

टेंभू उपसा सिंचन प्रकल्पासाठी मंजूर झालेल्या ₹७० कोटींच्या निधीबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. त्यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील सिंचन कामांना गती मिळणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले


*चौकट:* सांगोला तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवणे ही आमची बांधिलकी आहे. मंजूर झालेल्या निधीमुळे अपूर्ण कामांना नवसंजीवनी मिळेल आणि सिंचन व्यवस्थेला गती मिळणार आहे.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख

No comments:

Post a Comment