आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते नूतन वनसंरक्षक अधिकारी कुमारी मानसी मधुकर गोडसे यांचा सत्कार संपन्न
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील नरळेवाडी गावची सुकन्या कुमारी मानसी मधुकर गोडसे यांची वनसंरक्षक पदी (ACF) निवड झाल्याबद्दल सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी त्यांच्या राहत्या घरी शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 2 वाजता भेट देऊन नूतन वनसंरक्षक अधिकारी कुमारी मानसी मधुकर गोडसे यांचा सत्कार केला व त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
नूतन वनसंरक्षक अधिकारी कुमारी मानसी मधुकर गोडसे यांच्या आई वडिलांचा हि आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
या सत्काराप्रसंगी वाकी शिवणे गावचे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदेव सिद, कोंडीबा सिद, माजी चेअरमन मोहन आलदर, माजी सरपंच अनिल हंबीराव, मधुकर आलदर, बापूसाहेब आलदर, नवनाथ वाळखिंडे, राजू भाऊ कोकरे, काशिनाथ नरळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
कुमारी मानसी मधुकर गोडसे यांची नूतन वनसंरक्षक अधिकारी पदी निवड झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.



No comments:
Post a Comment