Recent Tube

Breaking

Thursday, October 30, 2025

लोटेवाडी येथे‌ शनिवारी शेकापक्षाचा भव्य मेळावा

 



लोटेवाडी येथे‌ शनिवारी शेकापक्षाचा भव्य मेळावा 



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



 लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत गौडवाडी येथे झालेल्या दैदिप्यमान मेळाव्यानंतर आता दुसरा मेळावा...

  लोटेवाडी गावांमध्ये आमादर डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी गौडवाडी येथे कार्यकर्ता मेळाव्यात घाणाघाती भाषण करून युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण केले आहे..

 शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या कार्यकर्त्यांचा दुसरा मेळावा शनिवार दिनांक १/११/२०२५ रोजी सायंकाळी ५-०० वाजता  लोटेवाडी (नवी ) येथील मारुती मंदिरा समोरील भव्य आशा पटांगणामध्ये आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख व तालुक्यातील पदाधिकारी,नेते यांच्या उपस्थितीत होणार आहे.

  लोटेवाडी येथे आयोजित मेळाव्याने महुद जिल्हा परिषद गटातील युवकांमध्ये आता पासुनच उत्साह संचारला आसुन गावोगावचे युवक मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत.गावोगावच्या जेष्ठांमध्ये सु़ध्दा मेळाव्याला जाण्याची चर्चा सुरु आसुन जेष्ठ नेते कार्यकर्ते सुध्दा स्व.आमदार आबासाहेब यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत असायचे तसेच लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या भाषणाची सुध्दा वाट पहात आहेत.

    शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटनेच्या लोटेवाडी येथे होणाऱ्या मेळाव्याची तयारी लोटेवाडी गावातील युवक जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आसल्याची माहिती शेतकरी कामगार पक्ष लोटेवाडी यांच्या वतीने सांगण्यात आली 

No comments:

Post a Comment