Recent Tube

Breaking

Tuesday, October 21, 2025

मेंढपाळ बांधवासोबत आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी साजरी केली दिवाळी



मेंढपाळ बांधवासोबत आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी साजरी केली दिवाळी




सांगोला (तालुका प्रतिनिधी): प्रत्येक घटकाची दीपावली आनंददायी व्हावी, प्रत्येकाच्या घरात दीप प्रज्वलित व्हावा याच हेतूने सांगोला तालुक्याचे आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी वंचित भटक्या जमातीतील असणार्‍या बांधवासोबत त्यांच्या पालावर जाऊन दीपावलीचा सण साजरा करून सर्वांपुढे एक आदर्श ठेवला.

दिपावली पाडव्याच्या पार्श्वभूमीवर घेरडी तालुका सांगोला येथे वंचित भटक्या जमातीतील मेंढपाळ बांधव मुक्कामी असल्याचे समजताच भाई आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी कार्यकर्त्यांसमवेत जाऊन अत्यंत साधेपणाने दीपावली साजरी करत मेंढपाळांचा आनंद द्विगुणित केला.

आमदार भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी उपस्थित सर्व मेंढपाळांना फराळाचे वाटप करून भेटवस्तू देऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांच्यासमवेत पालावरच बसून अत्यंत साधेपणाने दीपावली फराळाचा आनंद घेतला.

यावेळी विनायक कुलकर्णी सर, सोमाआबा मोटे, प्रा.किसन माने सर,  पिंटूदादा पुकळे, अमजद मुलाणी, भाऊसाहेब घुटूकडे, निलेश अनुसे, महेश बंडगर, रमेश अनुसे, परमेश्वर कोळेकर, महादेव माने, विष्णू देशमुख, केतन शेळके, सत्यवान घाटुळे यांच्यासह शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी व संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

11 वेळचे आमदार स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांनी आयुष्यभर अत्यंत साधेपणाने जीवन जगून इतरांना आनंद दिला. त्याच पद्धतीने त्यांचेच नातू आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे सुद्धा कोणताही बडे जाव न करता अत्यंत साधेपणाने जीवन जगत असून इतरांच्या सुखदुःखात सामील होत आहेत.त्यामुळे संपूर्ण तालुक्यात आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती तयार झाली आहेत. 


*गोरगरीबांच्या सुखदुखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य .....*

वंचित  भटक्या जमातीतील मेंढपाळ बांधव सांगोला तालुक्यात आले म्हणजे तालुक्याचा लोकप्रतिनिधी व प्रथम नागरिक या नात्याने गोरगरीबांच्या सुखदुखात सहभागी होणे हे माझे कर्तव्य आहे. स्व.आबासाहेबांनी जो विचार जपला तोच विचार जपण्याची माझ्यावरती जबाबदारी आहे. त्यामुळे सर्वसामान्यासह गोरगरीब जनतेला दिपावली चांगल्या पध्दतीने साजरी करण्यासाठी मी ही त्यांच्या आनंदात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.दिपावली सणाच्या देशमुख कुटुबियांकडून सर्वांना शुभेच्छा देत बळीराजासह सर्वसामान्य जनतेच्याअडीअडचणी सोडविण्यासाठी मी कटीबध्द आहे..!

आ.डॉ.बाबासाहेब देशमुख

No comments:

Post a Comment