आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीला लवकरच यश..सांगोला आगारास नवीन पाच बसेस मिळणार
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी परीवहन मंत्री मा.प्रताप सरनाईक यांच्या कडे सांगोला आगारास वाढीव नवीन बसेस देण्यासाठी १०/२/२०२५ रोजी मागणी केली आहे.
सध्या सांगोला आगारात काही दिवसांपूर्वी नवीन बसगाड्या राज्य सरकारने परीवहन विभागामार्फत दिल्या आहेत.सांगोला आगारातील बसेसच्या साधारणता २८८ फेऱ्या होत आहेत.आजही सांगोला आगारास जुन्या बसेसच्या भरवशवर रहावे लागत आहे.
सांगोला आगारास आणखीन नवीन बसेस देण्यासाठी रितसर अर्ज आमदार बाबासाहेब देशमुख यांनी परीवहन मंत्री ना.परीवहन सरनाईक साहेब यांच्याकडे या पुर्वी केलेली आहे.नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस साहेब व परीवहन मंत्री ना.प्रताप सरनाईक साहेब यांची भेट घेऊन नवीन एस टी बसेसच्या मागणी केल्याचे निदर्शनास आणून दिल्याने लवकरात लवकर नवीन बसेस देण्यासाठी आश्वासन दिले होते.
आमदार साहेबांनी केलेल्या मागणीमुळे सांगोला आगारास नवीन पाच बसेस लवकरच सांगोला आगाराच्या दिमतीला येणार असल्याची माहिती प्रसिद्ध प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी सांगितले





No comments:
Post a Comment