Recent Tube

Breaking

Tuesday, September 30, 2025

सांगोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना व नागरिकांना मदत करावी - डॉ परेश खंडागळे



सांगोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना व नागरिकांना मदत करावी - डॉ परेश खंडागळे



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या संपूर्ण भागात सरसकट पिकांचे पंचनामे करण्यात यावेत व शेतकरी बांधवांची संपूर्ण कर्जमाफी करावी 

ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा  

नुकसान भरपाई ची अनुदान रक्कम वाढवून मिळावी 

 शेतकरी बांधवांची सर्व कर्जांची बँक वसुली व शैक्षणिक तसेच महसूल कर वसुली थांबवावी 

दसरा व दिवाळी सण जवळ आल्याने शेतकऱ्यांना दिवाळीसाठी एक विशेष दिवाळी पॅकेज व किट देण्यात यावे 

जी जनावरे दगावली आहेत त्यासाठी योग्य तो मोबदला मिळावा 

 अतिवृष्टीमुळे विजेच्या उपकरणांचे नुकसान झालेले आहे त्यासाठी योग्य ती मदत मिळावी 

 विद्युत मंडळांना सांगून लवकरात लवकर लाईटचे पोल व डीपी ची कामे करण्यात यावे 

 घरांचे जे नुकसान झालेले आहे तेथे तत्काळ योग्य ती मदत देण्यात यावी.

 अशी मागणी खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोल्याचे सर्वेसर्वा डॉ परेश खंडागळे यांनी सरकार व प्रशासन यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment