आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांची पूरग्रस्त भागास भेट
त्वरित पंचनामे करून मदत करण्याचे प्रशासनाला आदेश
सांगोला प्रतिनिधी सांगोला तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने तालुक्यातील कडलास, सोनंद व इतर काही भागात जोरदार पाऊस झाल्याने पावसाचे पाणी नागरी वस्तीत शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीत आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी आज पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि स्थानिक प्रशासनाला त्वरित पंचनामे करून मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले.
या भेटीदरम्यान आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी पूरग्रस्तांच्या वेदनांना हाक देत तात्काळ दिलासा देण्याचे आश्वासन दिले.
आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख यांनी आज सकाळीच पूरप्रवण भागाचा दौरा केला. पूरग्रस्त शेतकरी, महिलांशी संवाद साधताना आमदार डॅा.बाबासाहेब देशमुख म्हणाले, प्रशासनाने त्वरित पंचनामे सुरू करावेत तसेच पूरग्रस्तांना आर्थिक मदत, धान्य, वैद्यकीय सेवा आणि घरबांधकामासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा. यावेळी आमदार महोदयांनी तहसीलदार संतोष कणसे यांच्याशी संपर्क साधून तत्काळ मदत करण्याचे निर्देश दिले.



No comments:
Post a Comment