Recent Tube

Breaking

Saturday, August 16, 2025

वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न




वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न




 रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


 

सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी शिवणे येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाच्या वतीने शनिवार दिनांक 16 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व रक्तदान शिबिरास सुरुवात करण्यात आली. 


या रक्तदान शिबिरास वाकी गावातील युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले. 


यावेळी या रक्तदान शिबिरास सांगोला तालुक्याचे माजी सभापती बाळासाहेब काटकर, चेअरमन अनिल कापसे, माजी सरपंच अनिल हंबीराव,सुभाष जुगदर, श्रीकांत जाधव, माजी चेअरमन संजय जाधव, माजी व्हा चेअरमन जगन्नाथ बुचडे, युवा नेते संतोष रोकडे, ऋषिकेश पाटील, नितीन होवाळ, भारत जाधव, देवा बुचडे, अजित बुचडे, अमित कांबळे, समाधान भांगे, प्रशांत गवळी, शंकर होवाळ, निलेश राऊत, मुस्तफा मुलाणी, समाधान होवाळ, सुनील चव्हाण, नवनाथ हांडे, राहुल बुचडे, सुभाष बुचडे, हिरा सोनार, सुमित कांबळे, करण बुचडे, अजित बुचडे, अमोल बुचडे, भिकाजी बुचडे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकी शिवणे या प्रशालेचे शिक्षक गोतसूर्य गुरुजी, मेटकरी गुरुजी व तसेच अक्षय ब्लड बँक सोलापूरचे संजय सरक, अजित सरक आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment