Recent Tube

Breaking

Friday, August 15, 2025

स्वातंत्र्यदिनानिमित्त सांगोला गुलजार ग्रुप मित्र परिवाराकडून जिलेबी वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा




स्वातंत्र्यदिनानिमित्त सांगोला गुलजार ग्रुप मित्र परिवाराकडून जिलेबी वाटप करून स्वातंत्र्य दिन साजरा 



 रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614




भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सांगोला तालुक्यातील नामवंत हॉटेल गुलजार ग्रुपच्या वतीने शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता एसटी स्टँड सांगोला येथे सर्व प्रवाशांना जिलेबी वाटून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.


 पंधरा वर्षापासून प्रजासत्ताक व स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गुलजार ग्रुप व मित्र परिवाराकडून सांगोला एसटी स्टँड मध्ये प्रवाशांना जिलेबी वाटप करून आगळावेगळा उपक्रम साजरा केला जातो. या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन सर्व स्तरातून गुलजार मित्र परिवाराचे केले जात आहे.


   यावेळी आगार प्रमुख विकास पोकळे साहेब, माजी नगरसेवक हाजी रफिक भाई तांबोळी, बस स्थानक प्रमुख पंकज तोंडे, वाहतूक नियंत्रक प्रशांत चंदनशिवे, दिपक (मालक) जाधव, संग्राम (नाना) गायकवाड, राजेंद्र गुळमिरे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन इंजि रमेश जाधव, संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय उपाध्यक्ष राजू मगर, मा नगरसेवक आलमगीर मुल्ला, तांबोळी जमात व शहाबाज भाई तांबोळी, सतीश खडतरे साहेब, नरेंद्र होनराव सर, शरद बनकर, मिलिंद भंडारे, संदीप कोळेकर, समीर नदाफ, निहाल तांबोळी, शाहरुख तांबोळी, परवेज बागवान, रफिक शेख, मुकेश चौधरी, गणेश जाधव, आवेसरजा तांबोळी, प्रेम होनराव, श्रवण गुळमिरे, शंभू खडतरे आदी मान्यवर उपस्थित होते


 उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलजार ग्रुपचे मा सरफराज तांबोळी यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment