लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी आरोग्य मंत्र्यासोबत विविध कामाबाबत केली चर्चा.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री नामदार प्रकाशजी आबिटकर साहेब यांची लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी मुंबई येथे भेटून.. सांगोला विधानसभा मतदार संघातील आरोग्य सुविधा याबाबत अनेक प्रश्नावर चर्चा केली.... त्यामध्ये सांगोला शहरातील बहुचर्चीत ट्राॕमा केअर सेंटर सुरु करण्याबाबत चर्चा केली ट्रामा केअर सेंटर मधील यंत्र सामुग्री तसेच कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा केली .. नवीन प्राथमीक आरोग्य केंद्र व उपकेंद्र मंजुर करण्यासाठी चर्चा करण्यात आली...तसेच भाळवणीचे ग्रामीण रुग्णालय तसेच भाळवणी वरुन भंडीशेगाव येथे शिफ्ट होणारे प्राथमीक आरोग्य केंद्र लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली... आशा अनेक आरोग्या सुविधा बाबत प्रश्नावर आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी चर्चा केली...
आमदार साहेबांनी केलेल्या या महत्त्वपुर्ण मागणीला मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली...



No comments:
Post a Comment