Recent Tube

Breaking

Friday, July 18, 2025

वाकी शिवणे गावच्या पारूबाई लक्ष्मण बुचडे यांचे वृद्धापकाळाने निधन.




वाकी शिवणे गावच्या पारूबाई लक्ष्मण बुचडे यांचे वृद्धापकाळाने  निधन. 


रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614


सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावच्या पारूबाई लक्ष्मण बुचडे यांचे गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरी वयाच्या 95 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावरती वाकी शिवणे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 


त्यांचा तिसऱ्या दिवसाचा विधी शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी सकाळी 7 वाजता  वाकी (शिवणे) स्मशानभूमीत करण्यात येणार आहे असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.  


त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे व परतुंडे असा मोठा परिवार आहे.


 पारूबाई लक्ष्मण बुचडे यांच्या निधनाने वाकी गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.


 वाकी शिवणे विकास सेवा सोसायटीचे माजीं व्हाईस चेअरमन जगन्नाथ बुचडे यांच्या त्या मातोश्री होत्या.

No comments:

Post a Comment