न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी....
रणसंग्राम न्युज संपादक नितिन होवाळ मो नं 9112049614
सांगोला प्रतिनिधी : न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली "गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः " गुरु शिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय कोणी महान नाही. जीवनाला दिशा देण्याचे काम हे गुरू करत असतात. या गुरूंच्या कायम ऋणामध्ये राहण्यासाठी ज्युनिअर कॉलेजमधील सर्व गुरूंना राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच राष्ट्रीय सेवा योजनेतील रोहिणी होवाळ या स्वयंसेवीकेने गुरुप्रती आदरभाव आपल्या मनोगतातून व्यक्त केला . यावेळी ज्येष्ठ शिक्षक श्री चंद्रकांत इंगळे, उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राचार्य प्रा केशव माने, संस्था सदस्य प्रा दीपक खटकाळे,प्रा जयंत जानकर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण बेहरे यांनी केले तर आभार प्रा.सौ जुलेखा मुलाणी यांनी मानले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एन एस एस प्रकल्पाधिकारी प्रा.संतोष राजगुरू व एन एस एस मधील सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.



No comments:
Post a Comment