Recent Tube

Breaking

Wednesday, July 16, 2025

सर्व लोककल्याणकारी योजनेचे मानधन वेळेवर करावे; आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी




सर्व लोककल्याणकारी योजनेचे मानधन वेळेवर करावे; आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांची विधानसभेत मागणी


सांगोला(प्रतिनिधी):-केंद्रसरकार पुरस्कृत संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावण बाळ , वयोवृध्द अपंग इत्यादी लोककल्याणकारी योजना शासनाने सुरु केल्या. परंतु संबंधीत योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन वेळेवर मिळत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी निराधार बांधवांच्या मानधनाविषयी  प्रश्न उपस्थित करुन निराधार लोकांना वेळेवर मानधन मिळाल्यास त्यांना दिलासा मिळू शकेल. शासनाने यावर लक्ष देऊन कार्यवाही करावी अशी ठाम मागणी अधिवेशनादरम्यान केली.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य, गोरगरीब, दिनदलित, कष्टकरी, शेतकरी बांधवांच्या  प्रश्नावरून आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केले होते. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करून व शेतकर्‍यांना सरसकट कर्ज माफी  द्यावी. अवकाळी पावसाने राज्यातील शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. त्या शेतकर्‍यांना अर्थिक मदत मिळावी. राज्यातील दिव्यांगांचे काही प्रश्न निधी अभावी प्रलंबित आहेत त्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करुन द्यावा. संजय गांधी योजनेतील लाभार्थींना वेळेत अनुदान वेळेवर मिळावे, माण व कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा देण्यात यावा. पंढरपुर ते सांगोला या महामार्गाने अनेक पालख्या जातात त्याचा विचार करुन हा महामार्ग चौपदरी करावा. शक्तीपीठ बाधीत शेतकर्‍यांच्या जमिनिला एकरी 4 कोटी रुपये देण्यात यावेत. सौरउर्जा योजनेतील अटी शिथील कराव्यात,  आदिशक्ती अभियान राबवत असताना मुलींना गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये यासाठी सरकारने कमी वयातच औषधे द्यावीत, परराज्यातून महाराष्ट्रात येणारी  भेसळयुक्त औषधे, आशा सेविका यांचे मनाधनात वाढ करावी, राज्यातील बी.ए.एम.एस व बी.एच. एम.एस.डॉक्टरांचे प्रलंबित प्रश्न आदी प्रश्न उपस्थित केले.

आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनमानाशी थेट संबंधित अनेक प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिले. हे मुद्दे सुरक्षितता, सन्मानाने जगण्याचा हक्क आणि मूलभूत नागरी गरजांशी संबंधित असल्याने, तातडीच्या व ठोस कृतीची गरज आ.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी स्पष्टपणे मांडली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी आम.डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेतली.

No comments:

Post a Comment