Recent Tube

Breaking

Wednesday, July 2, 2025

आमदार बाबासाहेब देशमुख यांचा आदर्शवत निर्णय; दोन दिवस वारकरी बांधवांना देणार आरोग्यसेवा




आमदार बाबासाहेब देशमुख यांचा आदर्शवत निर्णय; दोन दिवस वारकरी बांधवांना देणार आरोग्यसेवा


सांगोला (तालुका प्रतिनिधी):आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील लाखो वारकरी पायी चालत विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत.पायी वारीत वारक-यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिता ताई देशमुख यांनी पुढाकार घेतला असून गुरुवार  3 जुलै व शुक्रवार दि. 4 जुलै रोजी वाखरी तालुका पंढरपूर येथे वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा देणार आहेत.


आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा गाभा आहे. वाखरी येथे पंढरीत जाण्यापूर्वी 250 किलोमीटर अंतर चालून थकलेल्या भाविकांची सेवा व  वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिता ताई बाबासाहेब देशमुख यांनी स्वतः दोन दिवस रात्रंदिवस वारकऱ्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला आहे.


याप्रसंगी आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचेकडून वारकऱ्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहितीही दिली जाणार आहे. खांद्यावर भगवी पताका आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीची वाट चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉ.निकिता ताई देशमुख हे वारकऱ्यांना वैद्यकीय सेवा  देणार असल्याच्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

No comments:

Post a Comment