चारा छावण्यांच्या प्रलंबित बिलांबाबत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख विधानसभेत आक्रमक पवित्रा
7 दिवसांत प्रलंबित बिलाबाबत सकारात्मक निर्णय: मंत्री मकरंद आबा पाटील
सांगोला(प्रतिनिधी): सांगोला व मंगळवेढा येथील थकीत चारा छावणीच्या बिलाबाबत आक्रमक पवित्रा घेत लक्षवेधी मांडुन चारा छावणी चालकांचे प्रलंबीत अनुदान तातडीने देण्यात यावे, अशी मागणी आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेत लावून धरली. आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या प्रश्नांवर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी 7 दिवसांत चारा छावणी प्रलंबीत अनुदान प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितल्यामुळे चारा छावणी चालकांमधून आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला व मंगळवेढा येथील चारा छावणी बिले शासन दरबारी प्रलंबित असल्याने या छावणी चालकांची खूप मोठी अर्थिक कुचुंबना होत आहे. छावणी चालकांच्या या मागणीवर आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी यापूर्वीही वेळोवेळी पाठपुरावा व निवेदनाच्या माध्यमातून तसेच विधानसभा सभागृहाच्या माध्यमातून अधिवेशनामध्ये चारा छावणी चालकांची रखडलेली बिले मिळण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांनी चारा छावणीच्या माध्यमातुन अनेक जनावरे जगवली आहेत.तत्कालीन दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये तालुक्यातील पशुधन व पशुपालक यांचे हित डोळ्यासमोर ठेवून या छावणी चालकांनी खूप मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती. या चारा छावणी चालवण्यासाठी छावणी चालकांनी कर्ज काढून छावण्या चालवल्या आहेत.
2024 च्या मंत्री मंडळाच्या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मा.मकरंद आबा पाटील यांनी तो थकीत बिले देण्याबाबतचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.काही चारा छावणी चालकाऩी सुधारीत प्रस्ताव दिलेला असुन सध्या सांगोला तालुक्यातील 20 कोटी 86 लाख 90 हजार 596 रुपये व मंगळवेढा तालुक्यातील 12 कोटी 7 लाख 50 हजार 731 रुपये एवढी बिले थकीत आहेत ती बिले ताबडतोब मिळावीत अशी मागणी लावून धरली होती.
कोट :- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सांगीतले की, सदर प्रकरणाची फाईल मा.मुख्यमंत्री महोदय यांचेकडे जाऊन संबंधित खात्याकडे आलेली असुन येत्या 7 दिवसांत या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



No comments:
Post a Comment