Recent Tube

Breaking

Thursday, July 10, 2025

चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रयत्नाला यश, बुरलेवाडी ग्रामपंचायत निर्मितीचा आदेश जारी




चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रयत्नाला यश, बुरलेवाडी ग्रामपंचायत निर्मितीचा आदेश जारी 


सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील मेडशिंगी ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असल्याने नवीन ग्रामपंचायत विभाजनासाठी ग्रामस्थांमधून वेळोवेळी मागणी करण्यात येत होती. गावाचा स्वतंत्र विकास करण्यासाठी बुरलेवाडी ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याची मागणी डॉ. संतोष लवटे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी बुरलेवाडी येथील डॉ.संतोष लवटे यांची मागणी पूर्ण केली असून बुरलेवाडी ग्रामपंचायत निर्मितीचा आदेश जारी करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. 

       सांगोला तालुक्यातील मेडशिंगी ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ आकाराने मोठे असून अनेक वाड्या वस्त्या ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट आहे. ग्रा.पं.चा कारभार सांभाळणे सोयीचे व्हावे व नागरिकांनाही सुलभ व्हावे, यासाठी या ग्रामपंचायतीचे विभाजन करून नव्याने बुरलेवाडी ग्रामपंचायत निर्माण करण्यात यावे, याबाबत डॉ. संतोष लवटे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून मेडशिंगी ग्रामपंचायतीचे विभाजन करून बुरलेवाडी ही स्वतंत्र ग्रामपंचायत निर्मितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.

No comments:

Post a Comment