कु. तनुजा बालाजी चोपडे दहावी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
गुणवत्तेचा वारसा जपत कु. तनुजा बालाजी चोपडे दहावी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात आलेल्या एसएससी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2025 च्या परीक्षेत कुमारी तनुजा बालाजी चोपडे हिने 100% गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला.
दिनांक 13 मे 2025 रोजीच्या एसएससी बोर्ड परीक्षेच्या निकालातून आपल्याला अपेक्षित गुणांमध्ये वाढ होत आहे. हे लक्षात आल्यानंतर या विद्यार्थिनीने पुनर्मूल्यांकनासाठी फोटोकॉपी मागवून घेतली.
यामध्ये समाजशास्त्र व चित्रकला विषयात गुणांची वाढ झाली त्यामुळे तनुजा हिला शंभर टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळाला.
तिला तिचे आजी -आजोबा,आई- वडील,काका -काकी,शिक्षकवृंद या सर्वांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल आजी सौ.शिवगंगा भोजा चोपडे, आजोबा श्री.भोजा मारुती चोपडे, आई -वडील,काका -काकी, नातेवाईक,शिक्षक वृंद,गावकरी या सर्वांकडून तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.



No comments:
Post a Comment