Recent Tube

Breaking

Thursday, June 26, 2025

वाट्टेल ती किंमत मोजु ,पण आपल्या हक्काचे पाणी मिळवु--आ.भाई बाबासाहेब देशमुख




वाट्टेल ती किंमत मोजु ,पण आपल्या  हक्काचे पाणी मिळवु--आ.भाई बाबासाहेब देशमुख



शेटफळ येथे ३३ वी पाणी परीषद संपन्न झाली. 



टेंभु -म्हैसाळ योजनेची निर्मीती ज्या आंदोलनामुळे झाली. त्या आंदोलनाचाच महत्त्वपुर्ण भाग  म्हणजे ही  तेरा दुष्काळी तालुक्याची पाणी परीषद. ही पाणी परीषद दर वर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंती दिवशी या पाणी परीषदेचे आयोजन करण्यात येते.या वर्षीची ३३ वी पाणी परीषद शेटफळ ता.आटपाडी येथे मा‌.शिवाजीराव काळुंगे -सर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.

या पाणी परिषदेमध्ये बोलताना  सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डाॅ्.भाई बाबासाहेब देशमुख यांनी सुरवातीला शेटफळ गावचा व  स्व.आबासाहेबांचा तसेच सांगोला तालुक्याचा वेगळाच जिव्हाळा असल्याचे नमुद केले.ज्या वेळेस ऐंन उन्हाळ्यात शेटफळ गावाला पिण्याच्या  पाण्याची टंचाई होती त्यावेळेस कोळे गावातुन पाण्याचे  टँकर भरुन देण्याचे काम  स्व आबासाहेबांच्या नेत्तृवाखाली केले गेले होते. याची आठवण आमदार साहेबांनी करुन दिली‌.

आमदार बाबासाहेब देशमुख बोलताना म्हणाले   की,आज आपण ३३ व्या पाणि परीषधेतुन काय साध्य केले व येणाऱ्या काळात आपणास काय करायचे आहे या वरती विचार मंथन करण्यासाठी या परीक्षेच्या  निमित्ताने एकत्रीत आलो आहोत.

    आमदार बाबासाहेब देशमुख यांनी  राजेवाडीच्या पाण्याबाबत बोलताना सांगीतले की..सांगोला तालुक्याला हक्काचे मिळणारे राजेवाडीचे पाणी या वर्षी वेळेत मिळाले नाही. अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनाचा फटका राजेवाडी लाभक्षेत्रातील  शेतकऱ्यांना बसला आहे.मी स्वतः ही  बाब संमंधीत मंत्री महोदयांच्या  व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या  लक्षात आणुन दिली.त्यावेळेस राजेवाडी तलावातुन पाणी सोडण्यात आले व कटफळ येथील शेरेवाडी तलावात व खावसपुर खालील काही भागाला पाणी सोडण्यात आले.

   येणाऱ्या काळात राजेवाडीचे पाणी वेळेवर व नियोजन पुर्वक सोडले जाईल असे आश्वासन संमंधित अधिकारी वर्गाने मला  दिले आहे.त्या आश्वासनांची पुर्तता न केल्यास आपण शेतकऱ्यांचे आंदोलन उभे करु असे आमदार साहेबांनी राजेवाडीच्या पाण्याबाबत सांगीतले  

    आमदार साहेबांनी टेंभु म्हैसाळचे पाणी माण नदीमध्ये सोडुन माण नदी काठचे बंधारे भरुन घ्यावे अशी मागणी वारंवार केली होती. त्या मागणीचा विचार करुन ते पाणी उशीरा  माण नदीत  सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर  पाणी मिळाले नाही. येणाऱ्या काळात  टेंभु म्हैसाळ योजनेचे पाणी नियमाप्रमाणे दिले गेले पाहीजे.या वर्षी अधीकाऱ्याच्या नियोजना अभावी ते पाणी वेळेत मिळाले नाही आशा अधिकाऱ्याच्या बदल्या करण्यात आल्या आहेत काहींना या‌बाबत नोटीसा सुध्दा पाठवण्यात आल्या  आहेत.येत्या काळात टेंभु म्हैसाळ योजनेचे  पाणी वेळेत सोडण्यासाठी मी स्वता प्रयत्न करणार आसुन.या बाबत राज्याचे माननीय  मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी लेखी पत्राद्वारे तसे कळवले असुन मुख्यमंत्री साहेब या बाबत   सकारात्मक आहेत.

तरीसुध्दा ही परीषद राज्य‌ सरकारने या योजनेचे आपल्या हक्काचे पाणी वेळेत व पुर्ण क्षमतेने द्यावे असा  ठराव मी मांडत आहे.असे म्हणत सदर ठराव आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मांडला व  त्यास सर्वांनी हात उंच करुन मंजुरी दिली.

  तसेच आमदार बाबासाहेब देशमुख यांनी दुसरा  ठराव आशा प्रकारचा मांडला की..दुष्काळी भागाला वरदान ठरलेली टेंभु-म्हैसाळ योजना, या योजनेसाठी स्व.नागन्नाथ आण्णांनी स्व.आबासाहेबांच्या साथीने खुप प्रयत्न केले आहेत.अनेक आंदोलने केली आहेत .प्रत्येक वर्षी पाणी परीषधा घेऊन, सरकारचे लक्ष वेधले गेले आहे.तेरा दुष्काळी तालुक्याचा पाण्यासाठीचा लढा उभा केला व आज त्या लढ्याला यश आले असुन. आशा  या महत्त्वपुर्ण टेंभु- म्हैसाळ योजनेला "स्व.नागन्नाथ अण्णां नायकवडी " आसे नाव द्यावे आसा ठराव आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मांडला.हा ठराव मांडताना स्व आबासाहेबांनी हाच ठराव आठ वेळा मांडला असुन सभागृहात सुध्दा मागणी केल्याचे आमदार साहेबांनी सांगुन या ही ठरावास सर्वांची सहमती घेतली.

   आमदार बाबासाहेब देशमुख यांनी तिसरा महत्वपुर्ण ठराव मांडला तो भिमा नदीच्या पाण्याबाबतचा..सोलापुर जिल्ह्यासाठी वरदाई ठरलेल्या उजनी धरणाचे पाणी सोलापुर शहराला पिण्यासाठी म्हणुन भिमा नदीतुन सोडले जाते.ते पाणी ज्या ज्या वेळेस सोडले जाते.त्या त्या वेळेस भिमा नदीवरील बंधाऱ्याची दारे उघडली जातात.तसेच नदी काठचा विज पुरवठा सुध्दा बंद केला जातो.जर हे शेतकरी नियमाप्रमाणे पाणी पट्टी भरत असतील तर या शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी मिळालेच पाहीजे.तरी ज्या वेळी सोलापुर शहराला पाणी सोडले जाते त्या वेळेस बंधाऱ्याची दारे उघडु नयेत व नदीकाठचा विज पुरवठा बंद‌ करु नये...या बाबतचा  ठराव आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मांडला व सर्वांनी या ठरावास मंजुरी दिली.

आशा‌ प्रकारे  आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शेतीच्या व पिण्याच्या पाण्याबाबतचे महत्वाचे ठराव  या पाणी परिषदेमध्ये मांडले.व मंजुर केलेले सर्वच्या सर्व ठराव राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब व पाटबंधारे मंत्री या.राधाकृष्ण विखे-पाटील साहेब  यांना देणार असल्याचे सांगुन येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये हे प्रश्न  उपस्थित करणार असल्याचेही आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगीतले. 

   या पाणी परीषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळु़ंगे- सर , वैभव नायकवडी ,बाळासाहेब नायकवडी ,चोपडे सर,राजेंद्र (आण्णा) देशमुख,आंनंदराव पाटील,शिवाजीराव पाटील  इत्यादींनी आपले मनोगत व्यक्त केले.या पाणी परीषदेस तेरा दुष्काळी तालुक्यातील शेतकरी उपस्थित आसल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

No comments:

Post a Comment