Recent Tube

Breaking

Wednesday, June 4, 2025

श्री योगीराज सदगुरु भवानगिरी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शिरभावी येथे मोफत आरोग्य शिबीर



श्री योगीराज सदगुरु भवानगिरी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त शिरभावी येथे मोफत आरोग्य शिबीर


सांगोला (प्रतिनिधी): श्री योगीराज सदगुरु भवानगिरी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सांगोला शहरातील एमडी बालरोग तज्ञ डॉ. महावीर आलदर व आलदर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १५ जून २०२५ रोजी श्री क्षेत्र शिरभावी, येथे सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून वयाच्या १८ वर्षापर्यंत रुग्ण मोफत तपासले जातील व त्याचबरोबर रुग्णांना मोफत औषधे देखील दिली जातील.

सदर रुग्णांना ऍडमिट करण्याची गरज असल्यास आलदर हॉस्पिटल, एरंडे कॉम्प्लेक्स सांगोला येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार केले जातील. तरी शिरभावी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी व गरजू नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. सर्व रुग्णांनी रविवार दि. १५ जून रोजी आपले सर्व जुने रिपोर्ट व फाईल्स् घेवुन श्री क्षेत्र शिरभावी येथे यावे व मोफत शिबिराचा लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी ९०२९०४४००९ या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन डॉ. महावीर आलदर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment