Recent Tube

Breaking

Saturday, June 28, 2025

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न




न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज सांगोला मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न


शिक्षकांबरोबर पालकांचेही विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत  योगदान महत्त्वाचे - संस्थाध्यक्ष डॉ. अनिकेत (भैय्या )देशमुख


 न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर  कॉलेज सांगोला मध्ये   28 जून 2025 रोजी  जेईई, नीट व एम एच टी -सी इ टी या परीक्षेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात  सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. डॉ. गणपतरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करून करण्यात आली. याप्रसंगी  आयआयटी ला प्रवेश मिळविल्याबद्दल व एमएचटी-सीईटी परीक्षेत 99.55पर्सेंटाइल गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल  विराज सुरेश गाडेकर यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा सत्कार मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला चे अध्यक्ष डॉ. अनिकेत भैय्या देशमुख लाभले होते, तर अध्यक्षस्थानी संस्था सचिव मा. विठ्ठलरावजी शिंदे सर होते.

   गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना संस्था अध्यक्ष डॉ. अनिकेत भैय्या देशमुख म्हणाले की या संस्थेची स्थापना सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्व. डॉ.आ गणपतरावजी देशमुख यांनी तालुक्यातील व परिसरातील गरीब, गरजू, शेतकरी, कष्टकरी  विद्यार्थ्यांची शिक्षणाची सोय  व्हावी यासाठी झाली असल्याचे सांगितले. 

   या संस्थेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे पालकत्व स्वीकारून त्यांना या ठिकाणी क्रॅश कोर्सच्या माध्यमातून उत्तम मार्गदर्शन केल्यामुळेच अशा काठीण्य पातळी असलेल्या परीक्षेमध्ये MHT-CET मध्ये 46 हून अधिक विद्यार्थ्यांना 80 परसेंटाइल  च्या वर गुण प्राप्त झाले या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

     या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्था सचिव मा. विठ्ठलरावजी शिंदे सर यांनी हा क्रॅश कोर्स ज्या उद्देशाने सुरू केला, तो सफल झाला याची प्रचिती आपल्याला या वर्षीच्या निकालांमधून पहावयास मिळाली असे सांगितले. 2015- 16 साली सांगोला तालुक्यातील पहिला क्रॅश कोर्स सुरू करून तालुक्यातील व परिसरातील सर्वसामान्य गरजू गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे ठरवण्यात आले. त्या वर्षापासून दरवर्षी या क्रॅश कोर्स चे आयोजन केले जाते.  या क्रॅश कोर्समुळे  पुढील उच्च शिक्षणासाठी चे दरवाजे खुले होत आहेत.  लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांना बाहेर पाठवणे तालुक्यातील व परिसरातील पालकांना शक्य नाही त्यामुळे आम्ही हा क्रॅश कोर्सचा सांगोला पॅटर्न सुरू केला व यामधून अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ झाला. विद्यार्थ्यांच्या हिताचा असणारा हा सांगोला पॅटर्न सर्व महाराष्ट्रभर राबवला पाहिजे असे मत मांडले.

   याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून विराज गाडेकर, रोशनी सुळे,निकिता दिवसे,अंकिता खंडागळे,सानिका पवार, सानिका माळी तर पालकांमधून  सारिका सुळे,लक्ष्मी लवटे  यांनी आपल्या मनोगतामधून  कॉलेजने राबविलेल्या या क्रॅश कोर्स चे व सर्व मार्गदर्शक प्राध्यापकांचे कौतुक केले.

     यावेळी  डॉ. आस्था अनिकेत देशमुख, संस्था सदस्य श्री अवधूत कुमठेकर मालक,  प्रा. डॉ. अशोकराव शिंदे, प्रा दीपक खटकाळे,प्रा जयंत जानकर, प्राचार्य प्रा केशव माने,उपप्राचार्य प्रा संतोष जाधव,उपमुख्याध्यापक प्रा संजय शिंगाडे,पर्यवेक्षक श्री तात्यासाहेब इमडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा हनुमंत श्रीराम, सूत्रसंचालन प्रा सौ जयश्री पाटील व प्रा सौ.सुवर्णा काशीद  यांनी केले तर आभार  प्रा मिलिंद पवार यांनी मानले.

 सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा सौ येडगे आय एम , प्रा  बोराडे एन व्ही , प्रा सौ.माने एस एम ,प्रा सौ  मिसाळ एन डी ,प्रा कु कांबळे एस ए , प्रा सौ देशमुखे एस डी, प्रा केदार ए बी,प्रा गावडे टी जे,प्रा शेळके पी एस,प्रा सौ वाघमारे के बी, प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा लोले एन एस, प्रा गव्हाणे पी एन,प्रा राजगुरू एस डी, प्रा लवटे डी एस ,प्रा सौ लिगाडे एस एम,क्रीडा शिक्षक प्रा हिम्मतराव साळुंखे, प्रा संदीप भुसनर,प्रा भाऊसाहेब घुटुकडे,प्रा सौ चव्हाण एस एम,प्रा सौ ठोकळे एस पी, प्रा खांडेकर बी एस  व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment