Recent Tube

Breaking

Monday, June 2, 2025

आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांने‌ राजेवाडी तलावात पाणी सोडण्यास सुरुवात



आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या प्रयत्नांने‌ राजेवाडी तलावात पाणी सोडण्यास सुरुवात


शेरेवाडी तलाव लाभधारक शेतकरी व खवासपुर येथील शेतकऱ्यांनी आमदार बाबासाहेब देशमुख यांना राजेवाडी तलावातुन शेरेवाडी तलाव व खवासपुर ,उ़ंबरगावला  जाणार फाटा क्रमांक २१ ला पाणी सोडण्याची मागणी गेल्या दोनच दिवसांपुर्वी केली होती.

शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करुन 

  आमदार बाबासाहेब देशमुख यांनी फलटणचे मा.जाधव साहेब यांना   संपर्क केला व‌ में महिन्यातच राजेवाडी तलाव भरुन पाणी सांडीवरुन वाहुन नदीला जात आहे..परंतु तेच पाणी खवासपुर,उंबरगाव, कटफळ,जाधववाडी,चिकमहुद,नरळेवाडी, व महुदचा काही भाग, व वाकी या  लाभधारक‌ गावांना देण्याची मागणी केली.व जर राजेवाडी तलावातील सांडीवरुन वाहुन पाणी नदीला जात असेल व काही गावांना पाणीच मिळत नसेल तर हेच  पाणी लाभधारक शेतकऱ्यांना देता येते ही बाब आमदार बाबासाहेब देशमुख यांनी फलटणच्या अधिकाऱ्यांना सांगीतली व   या  शेतकऱ्यांवरती आंन्याय‌ होत असल्याची बाब अधिकाऱ्यांना बोलुन दाखवली.आमदार साहेबांच्या या मागणीला  अधिखाऱ्यांनी सकारात्मकता दाखवली ..

  आज सोमवारी संमंधीत अधिकाऱ्यांनी खवासपुर व उबरगावला जाणारा फाटा क्र २१ व शेरेवाडी तलावात पाणी सोडण्यास सुरुवात केल्याने.लाभधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी पाणी सोडण्यासाठी केलेल्या  प्रयत्नांने शेतकरी वर्ग खुष झाला असल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

No comments:

Post a Comment