Recent Tube

Breaking

Saturday, June 14, 2025

आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन



आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन 



रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



 सांगोला तालुक्यातील शिरभावी येथे नामवंत आलदर हॉस्पिटलच्या वतीने रविवार दिनांक 15 जून 2025 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत श्री योगीराज सदगुरू भवानगिरी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त मोफत आरोग्य शिराचे आयोजन केले आहे. 

या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत रुग्ण मोफत तपासले जातील व त्याबरोबर रुग्णांना मोफत औषधे दिली जातील. 

व तसेच महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना या योजनेअंतर्गत रुग्णांवरती मोफत उपचार केले जातील. 

तरी या मोफत आरोग्य शिबिराचा सांगोला तालुक्यातील रुग्णांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आव्हान बालरोग तज्ञ डॉ महावीर आलदर (MD) यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment