खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी वाकी गावातील नागरिकांच्या समस्या मांडल्या जिल्हाधिकारी यांच्या समोर.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
महुद-सांगोला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५जी महामार्गवरील वाकी (शिवणे) ता.सांगोला गावातील मंदिरे व नागरी सुविधा बाधित होणार आहेत. या गावातील नागरिकांनी आपल्या विविध समस्या खा धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या समोर मांडल्या होत्या 27 एप्रिल रोजी अधिकाऱ्यांच्या समवेत खा.धैर्यशील मोहिते-पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली होती..
याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी सोलापूर व NH-PWD यांच्या समवेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली व वाकी शिवणे गावातील समस्यांचे निराकरण करण्याच्या सूचना केल्या. यावर जिल्हाधिकारी यांनी वाकी शिवणे गावातील नागरीकांच्या प्रश्न मार्गी लावले जातील म्हणून सांगितले.



No comments:
Post a Comment