वाकी शिवणे येथे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी कवी संतराम होवाळ यांच्या निवासस्थानी दिली सांत्वनपर भेट.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथील सामाजिक कार्यकर्ते कवी संतराम होवाळ यांचे वडील माजी ग्रामपंचायत सदस्य भगवान लाला होवाळ यांचे बुधवार दिनांक 30/4/2025 रोजी निधन झाल्याने सांगोला तालुक्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी सोमवार दिनांक 5/5/2025 रोजी दुपारी 4 वाजता कवी संतराम होवाळ यांच्या कुटुंबास सांत्वन पर भेट दिली.
यावेळी हणमंत होवाळ, भारत होवाळ, बबन गोतसूर्य, सचिन गोतसूर्य, महेंद्र होवाळ, नितीन होवाळ इत्यादी उपस्थित होते.
आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी कवी संतराम होवाळ यांच्या मातोश्री बायनाबाई होवाळ यांच्या तब्येतीची अस्थेने केली चौकशी




No comments:
Post a Comment