Recent Tube

Breaking

Wednesday, April 2, 2025

मांजरी हायस्कूल, मांजरी ता. सांगोला विद्यालयाचे NMMS परीक्षेमध्ये यश.

 


मांजरी हायस्कूल, मांजरी ता. सांगोला विद्यालयाचे NMMS परीक्षेमध्ये यश.



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



       डिसेंबर मध्ये घेण्यात आलेल्या NMMS या स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यालयाचे 2 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले असून, सारथी शिष्यवृत्तीसाठी 2 विद्यार्थी पात्र झाले आहेत. या विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी 12 हजार रुपये चार वर्षे शिष्यवृत्ती मिळते.

 यामुळे पुढील चार वर्षाचा शिक्षणाचा खर्च पूर्ण होतो. यामुळे हे विद्यार्थी स्वावलंबी होतात. विद्यार्थ्यांमध्ये कु. वाघमारे ओवी, ताठे प्रणव, कु. मोकाशी समृद्धी, कु. पवार समृद्धी हे शिष्यवृत्तीधारक झाले असून, ताठे प्रणव याने आपल्या अपंगावरती मात करून शिष्यवृत्तीमध्ये येण्याचा मान पटकावला आहे. 

यांना मार्गदर्शन शिक्षक म्हणून (विभागप्रमुख ) श्री. मागाडे सज्जन, श्री. हागरे विशाल, श्रीमती नवले छाया यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रायभान यू. व्ही, पर्यवेक्षक श्री. मासाळ जे. एस., गुरुकुल विभागाचे विभाग प्रमुख श्री. गायकवाड विठ्ठल तसेच स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, विद्या समिती, शिक्षक - पालक संघ, पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment