Recent Tube

Breaking

Thursday, April 17, 2025

निरा देवधर पाण्यातून सांगोला पंढरपूर मतदार संघासाठी एक टीएमसी वाढीव पाणी मंजूर - आमदार डॉ बाबासाहेब देशमुख.




निरा देवधर पाण्यातून सांगोला पंढरपूर मतदार संघासाठी एक टीएमसी वाढीव पाणी मंजूर - आमदार डॉ बाबासाहेब देशमुख.



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614




 निरा देवधर योजनेतून सांगोला व पंढरपूर मतदार संघासाठी एक टीएमसी वाढीव  पाणी मंजूर करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्याची माहिती आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिली.


 या बैठकीमध्ये सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार डॉ बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजीबापू पाटील, जलसंपदा सचिव दीपक कपूर, कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


 आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीवरून धरण क्षेत्रातून बंदिस्त पाईपलाईन करून मैल क्रमांक 95 येथे एक टीएमसी पाणी थेट कॅनॉलमध्ये सोडण्याचा निर्णय होऊन तातडीने याचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.


 लवकरच या कामास सुरुवात केली जाणार असून त्यामुळे सांगोला पंढरपूर मतदार संघात निरा उजवा कालवा हा बारमाही होणार असल्याने लाभ क्षेत्रातील सर्व गावांना याचा खूप मोठा फायदा होणार असल्याची माहिती सांगोला तालुक्याचे आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांनी दिली.

No comments:

Post a Comment