Recent Tube

Breaking

Thursday, April 3, 2025

सांगोला तालुक्यातील नामवंत आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.




सांगोला तालुक्यातील नामवंत आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला तालुक्यातील नामवंत आलदर हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी  सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राऊत मळा (माळवाडी) येथे करण्यात आले आहे.

 या शिबिरामध्ये जन्मलेल्या बाळापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत रुग्ण मोफत तपासले जातील व त्याबरोबर रुग्णांना मोफत औषधे दिली जातील.

 सर्जरी विभाग

लघवी व मूत्रपिंड यावरील शस्त्रक्रिया, आतड्यावरील शस्त्रक्रिया, जन्मता व्यंग / दोष यावरील शस्त्रक्रिया, व इतर लहान मुलांच्या शस्त्रक्रिया.


 नवजात शिशु अतिदक्षता विभाग

कमी दिवसाचे बाळ, निमोनिया, कावीळ वाढ कमी असल्यास, बाळाला झटके येत असल्यास, कमी वजनाचे बाळ, जन्मानंतर लहान बाळ रडले नसल्यास.


 लहान मुलाचे अतिदक्षता विभाग -

फिट  झटके येत असल्यास, निमोनिया, सर्पदंश, बालदमा, डेंगू / मलेरिया, टायफाईड व इतर आजारावर उपचार केले जातील.


 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वरील आजारावर मोफत उपचार केले जातील.


 तरी  या मोफत आरोग्य शिबिराचा सांगोला तालुक्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान नामवंत बालरोग तज्ञ डॉ. महावीर आलदर यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment