Recent Tube

Breaking

Friday, April 25, 2025

खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगोला येथे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीराचे आयोजन.




खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल,सांगोला येथे मोफत मुत्ररोग निदान व मोफत शस्त्रक्रिया उपचार शिबीराचे आयोजन.



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील सांगोला महाविद्यालय जवळ असणाऱ्या खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे गोर गरीब गरजू रुग्णांसाठी मोफत मूत्ररोग निदान उपचार शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले आहे अशी माहिती डॉ. परेश खंडागळे यांनी दिली.


सदरच्या शिबिरामध्ये मूत्ररोग, मुतखडा,प्रोस्टेट ग्रंथीची सूज, मूत्राशयाचे आजार,किडनीचे आजार,किडनीतील खडे, मूत्रवाहिनी मधील खडे,मूत्राशयातील खडे,लघवी संबंधितील आजार इ. आजारांवर मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत



या शिबिरासाठी सर्व रुग्णांनी आपले जुने रिपोर्ट व फाईल्स घेऊन यावे .ज्या रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे अश्या रुग्णांवरती होणारी शस्त्रक्रिया केशरी , पिवळे तसेच पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना महात्मा जोतीराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना यांच्या मार्फत पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत.मोफत मूत्ररोग उपचार शस्त्रक्रिया शिबिराचा सर्व गोर-गरीब गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 7588506196, 8999611622 या नंबरवर संपर्क करावा. व या आरोग्य शिबिराचा गरजू नागरिकांनी व रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान डॉ परेश खंडागळे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment