Recent Tube

Breaking

Friday, April 18, 2025

जवळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.




जवळा येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.



सांगोला प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, विश्वरत्न, विश्वभूषण, क्रांतीसूर्य, परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात जवळा ता. सांगोला येथे संपन्न करण्यात आली. 

14 एप्रिल रोजी अभिवादन करण्यासाठी विधान परिषदेचे माजी आमदार, सोलापूर जिल्ह्याचे लाडके नेते मा. श्री. दिपक आबा साळुंखे - पाटील हे उपस्थित होते. 



त्यांनी आपल्या मनोगतामध्ये सर्व समाज बांधवांना बाबासाहेबांनी सांगितलेला मुलमंत्र सांगितला. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा. यानुसार आपण आपले जीवनक्रम चालविले पाहिजे. त्यामुळे भारताला दिलेली राज्यघटना आज जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे प्रत्येकांनी नियमित वाचन केले पाहिजे. प्रत्येकाने आपल्या डोक्यामध्ये बाबासाहेबांचे विचार पेरले पाहिजे व ते आपल्या आचरणात आणले पाहिजेत असे मत व्यक्त केले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आज आपण जवळा गावच्या सरपंच पदी उच्च शिक्षित आपल्या समाजातील सज्जन मागाडे यांची बिनविरोध निवड केली आहे. बाबासाहेबांनी गावकुसाच्या बाहेर राहणाऱ्या समाजाला आज गावामध्ये आणले. आज समाजातील युवक आपले कौशल्य विविध ठिकाणी दाखवत आहेत. आपणही शिक्षण घेऊन विविध उच्च विभूषित पदे मिळवून जवळा गावचे नाव जगामध्ये करावे असे सांगितले.



15 एप्रिल रोजी महामानवाच्या  134 व्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 134 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. यामध्ये महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावरती होती. सायंकाळी मुली व महिला यांचे विविध खेळ व कलागुणांचा कार्यक्रम घेण्यात आला. यशस्वी शालेय मुली यांना शालेय साहित्य देऊन व मोठ्या मुलींना घड्याळ देऊन गौरवण्यात आले. यावेळी सरपंच मा. सज्जन मागाडे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले ज्या पद्धतीने आज आपण विविध खेळामध्ये व कलागुणांमध्ये यश मिळविता. तसेच यश शालेय जिवनात मिळवावे. स्वतःचे, आपल्या आई - वडीलांचे, समाजाचे नाव देशभर करावे.


16 एप्रिल रोजी महामानवाच्या प्रतिमेची भव्य व दिव्य सवाद्य मिरवणूक जवळा गावामधून काढण्यात आली. मिरवणूकीची सुरुवात सौ. रूपमतीदेवी दिपकराव साळुंखे - पाटील यांनी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन व त्रि-शरण पंचशीला घेवून करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावरती बौद्ध उपासक, उपासिका, ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी भोजनानी कार्यक्रमानी सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment