सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी सांगोला बंदची हाक.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना फासीची शिक्षा झालीच पाहिजे या मागणी साठी सकल मराठा समाज सांगोला तालुक्याच्या वतीने रविवार दिनांक 9 मार्च रोजी सांगोला बंद व रस्ता रोको ची हाक देण्यात आली आहे.
या बाबतचे निवेदन सांगोला पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भिमराव खणदाळे यांना बुधवार दिनांक 5 मार्च रोजी देण्यात आले.
या प्रकरणातील सर्व आरोपीना फासीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी रविवार दिनांक 9 मार्च रोजी सांगोला बंद व विविध ठिकाणी रस्ता रोको करण्यात येणार आसल्याचे निवेदन सकल मराठा समाज्याच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे यांना देण्यात आले.
या वेळी सकल मराठा समाज सांगोला तालुक्याचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:
Post a Comment