दैनिक माणदूत एक्सप्रेस परिवाराकडून इफ्तार पार्टी संपन्न.
सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा : तहसीलदार कणसे
सांगोला(प्रतिनिधी):-मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमाजन निमित्तानं होणारी ’इफ्तार पार्टी’ म्हणजे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक आहे. अशा प्रकारे हिंदु-मुस्लीम एकतेचे प्रतीक असलेले कार्यक्रम घेण्याची सध्या नितांत गरज आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा हीच गरज ओळखून दैनिक माणदूत एक्सप्रेसच्या वतीने घेण्यात आलेला इफ्तार पार्टीचा कार्यक्रम स्तुत्य आहे. यापुढे ही परंपरा कायम राखावी. दैनिक माणदूत एक्सप्रेसचे सामाजिक कार्य आदर्शवत असल्याचे तहसीलदार संतोष कणसे यांनी सांगितले.
वाचकांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या दैनिक माणदूत एक्सप्रेस कडून काल शनिवार दि.22 मार्च रोजी रमजानच्या पार्श्वभूमीवर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी तहसीलदार श्री.कणसे बोलत होते. यावेळी तहसीलदार संतोष कणसे यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
समाजात बंधुभाव वाढावा याकरिता मुस्लिम बांधव पहाटेपासून कडक उपवास धरतात. हे उपवास केवळ आपल्याच समाजापुरतेच मर्यादित न ठेवता ते सर्व धर्मातील लोकांच्या कल्याणाकरिता धरतात. त्यात पवित्र रमजान महिन्यातील अशा इफ्तार पार्टीमुळे दोन्ही समाजांतील एकोपा वाढण्यास मदत होते. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे वारंवार आयोजन केल्यास त्याचा संपूर्ण मानवजातीला लाभ होईल.
उपस्थिांचे स्वागत संपादक मोहन मस्के यांनी केले. तर रफिकभाई तांबोळी, बशीरभाई तांबोळी यांनी पवित्र रमजान महिन्याचे महत्त्व विशद केले. विनायक मस्के, सुनिल मस्के, अमेय मस्के, अशोक लोंढे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास धाडसी नेतृत्व रमेशआण्णा देशपांडे यांच्यासह मित्रपरिवारांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी शहर व परिसरातील मुस्लीम समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.




No comments:
Post a Comment