यशोदा हॉस्पिटलमध्ये महिला दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
यशोदा हॉस्पिटल वाढेगाव नाका सांगोला येथे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार दिनांक 8 मार्च 2025 रोजी महिलांचे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती सांगोला शहरातील नामवंत स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ विजय बंडगर यांनी दिली.
यशोदा हॉस्पिटल हे मॅटनिटी, गायनॅक, व सर्जिकल असे सुसज्ज हॉस्पिटल असून यावर्षी हॉस्पिटलला 25 वर्ष पूर्ण होत आहेत तो एक योगायोग व महिला दिनानिमित्त महिलांचे रुग्णसेवा शनिवार दिनांक 8 मार्च रोजी मोफत केली जाईल. या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर पण गेली 25 वर्ष सुरु आहे.
शनिवार दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 11 ते 3 या वेळेत सर्व महिलांची मोफत तपासणी केली जाईल. ज्या रुग्णांना सोनोग्राफीची गरज असल्यास त्याची सोनोग्राफी कमी चार्जेस घेऊन केली जाईल. तसेच रक्त तपासणीमध्ये पण 20% चार्जेस कमी केले जातील. या दिवशी होणारे बाळातपण अथवा शस्त्रक्रिया यामध्ये डिस्काउंट दिला जाईल. तरी सांगोला शहर व तालुक्यातील सर्व गरजू महिलांनी याचा लाभ घ्यावा. असे आव्हान डॉ विजय बंडगर यांनी केले आहे.
तरी या शिबिरासाठी नाव नोंदणी मो नं 9284322072 यावरती करणे गरजेचे आहे. येताना पूर्वीचे काही रिपोर्ट व ट्रीटमेंट संदर्भातील सर्व कागदपत्रे सोबत आणावीत.
यावर्षी यशोदा हॉस्पिटलला 25 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस स्त्रीरोग व प्रसुती तज्ञ डॉ विजय बंडगर यांनी व्यक्त केले आहे. तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा.



No comments:
Post a Comment