Recent Tube

Breaking

Monday, March 31, 2025

आमदार बाबासाहेब देशमुखांच्या प्रयत्नांने राजेवाडीचे‌‌ पाणी येणार




आमदार बाबासाहेब देशमुखांच्या प्रयत्नांने राजेवाडीचे‌‌ पाणी येणार.


प्रशासन लागले कामाला.




पंढरपुर दौऱ्यावर राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस साहेब आले आसता लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख साहेबांनी राजेवाडी तलावात‌ पाणी सोडण्याची मागणी केली होती ...त्या वेळेस मुख्यमंत्री साहेबांनी आमदार‌ बाबासाहेबांना तीन चार‌ दिवसात पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु केली जाईल आसे आश्वासन पालकमंत्री मा.जयकुमार गोरे साहेब यांच्या व आमदार‌ गोपीचंद  पडळकर साहेब यांच्या समक्ष शब्द दिलेला होता...

 सोमवार दि.३१ मार्च २०२५ रोजी कटफळ येथे  कॅनाॅल साफ करण्याचे व वेगवेगळ्या तोट्या बंद करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु झाले आसुन...आमदार बाबासाहेब देशमुख यांनी  मा.मुख्यमंत्र्यांना केलेली मागणी पुर्णत्वास येत  असुन ..आमदार बाबासाहेब‌ देशमुख यांनी शनीवारी आमावस्ये दिवशी  कटफळ येथील संत बाळु मामांच्या पवित्र मंदिरात उभे राहुन सांगीतले होते  की..राजेवाडीचे पाणी येणारच आहे तसा मला   मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला आहे. 

दिलेला होता तो शब्द आज खरा होताना दिसत आहे पाणी येण्याच्या पुर्व‌ प्रक्रियेला प्रशासना कडुन सुरुवात झालेली असुन कटफळ भागातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पाणी येण्याचा आनंद दिसत आसुन,शेतकरी वर्ग  आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कौतुक करताना दिसत असल्याची  माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली.

No comments:

Post a Comment