Recent Tube

Breaking

Tuesday, March 4, 2025

महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बोद्धांच्या हाती देण्यात यावे - विनोद भैय्या उबाळे



महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बोद्धांच्या हाती देण्यात यावे - विनोद भैय्या उबाळे 


बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन ऍक्ट तात्काळ रद्द करावा - वंचित बहुजन आघाडी सांगोला 


 सांगोला प्रतिनिधी  बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 चा व्यवस्थापन ॲक्ट  तात्काळ रद्द करून महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन हे संपूर्ण बोद्धांच्या हाती देण्यात यावे व बुद्धगया महाबोधी महाविहार येथे सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनातील सर्व मागण्या त्वरित मान्य करावेत. वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुका व शहर च्या वतीने बौद्धांचे पवित्र ठिकाण बोधगया हे पूर्णपणे मुक्त करून बौद्धांच्या हाती सोपवण्यात यावे, तसेच गेल्या अनेक दिवसापासून बौद्ध समाजाच्या बौद्ध भिक्खूंचे आंदोलन सुरू असून उपोषण चालू आहे. 

हिंदूंच्या देवळात हिंदूंचे पुजारी मुस्लिम समाजाच्या मध्ये मुस्लिम बांधवांचे मौलवी असतात, जैन समाजाच्या मंदिरात जैन बांधवांचे पुजारी असतात, मग बौद्ध विहारात बौद्ध भिक्षुक असले पाहिजेत.


   जगभरातील व देशातील सर्व बौद्ध बांधवांच्या भावनांचा विचार व आदर करून 1949 चा व्यवस्थापन ॲक्टचा कायदा पूर्णपणे रद्द करून बौद्धांच्या हातामध्ये बोधगया व बुद्ध विहार सोपवण्यात यावे, या मागणीसाठी सांगोला तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 10 -03- 2025 रोजी  तहसील कार्यालयासमोर संविधानिक मार्गाने निदर्शने व धरणे आंदोलन करीत असले बाबत असे तहसीलदार सांगोला तहसील कार्यालय यांच्यामार्फत तमाम भारत देशातील बौद्ध बांधवांचा भावनांचा विचार करून सर्व मागण्या मा. राष्ट्रपती भारत सरकार यांच्याकडे पोहोच करावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली, 


यावेळी जिल्हा उपाध्यक्ष लालाभाई मुलाणी, वंचित बहुजन आघाडी सांगोला तालुकाध्यक्ष विनोद (भैय्या)उबाळे, महासचिव स्वप्नील सावंत, सचिव दिपक होवाळ, युवा नेते पोपट तोरणे, युवा नेते बाबा सरतापे, तालुका उपाध्यक्ष अक्षय कांबळे, तालुका संघटक समाधान होवाळ, प्रसिद्धी प्रमुख वैभव काटे, किरण सावंत, साहेब कांबळे, बापू कांबळे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment