डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महूद बु येथे बैठक संपन्न.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सांगोला तालुक्यातील महूद बु येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या नियोजनाची बैठक रविवार दिनांक 16 /3/ 2025 रोजी भीमनगर महूद बु येथे ॲड. प्रफुल्ल उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाची नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी नितीन सरतापे, कार्याध्यक्ष दिगंबर सवणे, उपाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल उबाळे, उपाध्यक्ष सुहास चंदनशिवे, खजिनदार दयानंद सरतापे, सचिव संदीप बाबर यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.
या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमाचा मागील वर्षाचा संपूर्ण अहवाल देण्यात आला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे बैठकीमध्ये ठरले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या बैठकीसाठी भीमनगर मधील सर्व नेते, पदाधिकारी व युवक भीमसैनिक व तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.



No comments:
Post a Comment