डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त वाकी शिवणे येथे बैठक संपन्न.
रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीची नूतन कार्यकारणीची निवड रविवार दिनांक 10 मार्च 2025 रोजी सायंकाळी 8 वाजता दीक्षाभूमी कट्टा वाकी शिवणे येथे घेण्यात आली.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या नूतन अध्यक्षपदी शंकर होवाळ, उपाध्यक्षपदी यश गोतसूर्य, तर खजिनदारपदी निलेश होवाळ, समाधान होवाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या या नूतन कार्यकारणीच्या निवडीच्या बैठकीमध्ये मागील जयंतीच्या कार्यक्रमाचा संपूर्ण अहवाल देण्यात आला.
व तसेच या बैठकीमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे सर्वानुमते ठरले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या बैठकीसाठी यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिपक होवाळ, नितीन होवाळ, बबन गोतसूर्य, सचिन होवाळ, सर्जेराव उबाळे, सुरेश होवाळ, सचिन गोतसूर्य, अनिल होवाळ, शैलेश झेंडे, महेंद्र होवाळ, शहाजी होवाळ, स्वप्निल गाडे, बंटी होवाळ, विठ्ठल मोरे, अमोल होवाळ, अजित होवाळ, संभाजी गोतसूर्य, दादासाहेब होवाळ, राहुल होवाळ, समाधान गायकवाड, बापूसाहेब मोरे, विशाल उबाळे, संकल्प गाडे, अक्षय होवाळ, भाऊसाहेब होवाळ, प्रताप उबाळे, गणेश गोतसूर्य, प्रथमेश होवाळ, विक्रम होवाळ, मायआप्पा उबाळे व तसेच असंख्य भीमसैनिक उपस्थित होते.



No comments:
Post a Comment