Recent Tube

Breaking

Friday, February 28, 2025

माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून स्व भगवानराव गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली




माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्याकडून स्व भगवानराव गोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 


पालकमंत्री जयकुमार गोरे आणि परिवाराचे माजी आमदार दिपकआबा कडून सांत्वन 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी 


महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायराज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांचे वडील स्व.भगवानराव (दादा) गोरे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले. शुक्रवार दि २८ फेब्रुवारी रोजी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी स्व भगवानराव गोरे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. 



बोराटवाडी ता माण जि. सातारा येथील ना जयकुमार गोरे यांच्या निवासस्थानी शुक्रवार दि २८ रोजी स. ९.३० वा. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी गोरे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. याप्रसंगी स्व.भगवानराव गोरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. या दुःखातून सावरण्याचे बळ गोरे कुटुंबियांना मिळो आणि भगवानराव गोरे यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थनाही यावेळी माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी केली.

No comments:

Post a Comment