Recent Tube

Breaking

Monday, February 17, 2025

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा आनंद शेंडे याचा सत्कार संपन्न.



आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते क्रिकेटमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारा आनंद शेंडे याचा सत्कार संपन्न.



रणसंग्राम न्युज संपादक नितिन होवाळ मो नं  9112049614


सांगोला सारख्या ग्रामीण भागामध्ये सांगोल्याच्या मैदानावर रात्रंदिवस मेहनत घेऊन  क्रिकेटचा सराव करणारा कु.आनंद शेंडे याने सांगली येथे एका स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून १३ धावांमध्ये १० बळी घेणारा भारतामध्ये क्रिकेटपटू अनिल कुंबळे नंतर दुसरा खेळाडू आनंद ठरला. 

आनंदच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे सांगोल्याचे लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी कु.आनंद याचे अभिनंदन करून भावी क्रिकेटविश्वातील यशस्वी वाटचालीस  हार्दिक शुभेच्छा दिल्या.

यावेळी आनंद यास शुभेच्छा देताना डॉ. अमर शेंडे, डॉ. निरंजन केदार, प्रशांत काशीद, गणेश किरगत उपस्थित होते.


आनंद अमरसिंह शेंडे हा सांगोला येथे राहण्यास आहे तो न्यू स्कूल सांगोला या शाळेत सातवीच्या वर्गात शिकत आहे मागील चार ते पाच वर्षापासून तो सांगोलच्या मैदानावर क्रिकेटचा सराव करीत आहे त्याने आतापर्यंत विविध स्पर्धेत यश मिळविले आहे.

आनंद यास कोच म्हणून प्रशांत काशीद सर लाभले आहेत. आनंदच्या या यशामुळे आनंद चे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

No comments:

Post a Comment