Recent Tube

Breaking

Thursday, January 9, 2025

रविवारी सांगोल्यात जय मल्हार क्रांती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा

 


रविवारी सांगोल्यात जय मल्हार क्रांती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा  

 

सांगोला प्रतिनिधी ; १२ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ११:०० ते ३ या वेळेत.श्री. गणेश मंगल कार्यालय महुदरोड सांगोला येथे जय मल्हार क्रांती संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. सदर सभेस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दौलतनाना शितोळे व महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच या सर्वसाधारण सभेत नवीन पदाधिकारी यांच्या निवडी केल्या जाणार आहेत.जय मल्हार क्रांती संघटनेत काम करण्याची आवड असणाऱ्या इच्छुक समाज बांधवांनी 9922399588,97303 70888,9011279964

 या नंबर वर संपूर्ण साधावा असे अवाहन करण्यात येत आहे.तसेच या कार्यक्रमात जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांची उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी (राज्यमंत्री दर्जा) निवड झाल्याबद्दल व सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य व समाज बांधवांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यातील समाज बंधू भगिनींनी या वार्षिक सर्वसाधारण सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सर्वसाधारण सभेचे संयोजक सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश मंडले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment