विष्णुपंत दादरे लोणारी यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील किडेबिसरी ग्रामपंचायत समोर विष्णुपंत दादरे लोणारी यांच्या जयंती निमित्त तसेच आमदार डॉ बाबासाहेब देशमुख व डॉ सुदर्शन घेरडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत श्रीमुनी घेरडे चॅरिटेबल संस्था व डॉ सुदर्शन घेरडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
या शिबिरासाठी नामवंत अस्थिरोग तज्ञ डॉ प्रीतम पालकर, स्त्रीरोग तज्ञ डॉ सुभाष कोळेकर, जनरल फिजिशियन डॉ पांडुरंग नरळे, दंतरोग तज्ञ डॉ मीनल घेरडे, नेत्ररोग तज्ञ डॉ कुणाल पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
तरी या शिबिराचा सांगोला तालुक्यातील नागरिकांनी व रुग्णांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा.
आसे आव्हान श्रीमुनी ग घेरडे मेडिकल चॅरिटेबल संस्था व डॉ सुदर्शन घेरडे मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment