महूद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये अनेक आजारावरती मोफत औषधोपचार.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
सांगोला तालुक्यातील महूद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सि यु मध्ये जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत हृदयविकार, मुतखडा, किडनीचे आजार, सर्पदंश, विषबाधा, फुफ्फुसाचे आजार, पोट विकार, आक्सीडेंट, लहान मुलांचे आजार व उपचार डेंगू आणि मलेरिया या आजारावरती मोफत उपचार करण्यात येणार.
व तसेच महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगारांनाही मोफत औषधोपचार मिळणार.
या योजनेत नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील 3 व्यक्तींना सर्व आजारावर रुग्णालयात भरती व मोफत औषधोपचार करण्यात येणार.
तरी या योजनेचा सांगोला तालुक्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान महूद मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू महूद यांच्या वतीने करण्यात आले आहे.



No comments:
Post a Comment