खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ या योजनेअंतर्गत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सांगोला येथे मिळणार विनामूल्य सेवा.
रुग्णालयातील उपचार प्रति लाभार्थी व त्याच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना सर्व आजारावर रुग्णालयात भरती व मोफत औषधोपचार करण्यात येणार.
यामध्ये सिजर, डिलिव्हरी, हर्निया, हायड्रोसिस, अपेंडिक्स, गर्भाशयाची पिशवी काढणे, डेंगू, मलेरिया, हृदयरोग, फुफुसाचे, पोटाचे, मेंदूचे, किडनीचे आजार, एक्सीडेंट फॅक्चर आशा अनेक आजारावर मोफत उपचार मिळणार.
या योजनेसाठी पात्र लाभार्थी सदर योजनेअंतर्गत नोंदणी सक्रिय जीवित बांधकाम कामगार तसेच त्याच्या कुटुंबांमधील पती अथवा पत्नी आणि प्रथम दोन आपत्य ही लाभार्थी म्हणून गणण्यात येतील.
तरी या योजनेचा सांगोला तालुक्यातील गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आव्हान खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ परेश खंडागळे यांनी केले आहे.
ज्यांनी अजून या सुविधेसाठी लागणारे कार्ड तयार केलेले नाही त्यांनी त्वरित खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडलास रोड सांगोला येथे भेट द्यावी





No comments:
Post a Comment