Recent Tube

Breaking

Wednesday, December 4, 2024

न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज ची इतिहास विषयाची क्षेत्रभेट उत्साहात संपन्न.



न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज ची इतिहास विषयाची क्षेत्रभेट उत्साहात संपन्न.



 रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज सांगोला येथील इतिहास विषयाची एक दिवसीय क्षेत्रभेट उत्साहात संपन्न झाली ही क्षेत्रभेट दिनांक 29 11 2024 रोजी सकाळी 5 वाजता न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि. कॉलेज सांगोला येथून रवाना झाली. प्रथमत: कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम असलेले नृसिंहवाडी या क्षेत्रात भेट दिल्यानंतर तेथून पुढे निसर्ग सौंदर्याने नटलेला सह्याद्री पर्वतातील ज्योतिबा डोंगराच्या परिसरामध्ये  पुरातन मंदिर असलेल्या ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेण्यात आले.



 तेथून पुढे ही क्षेत्रभेट  महाराष्ट्रातील प्रमुख ऐतिहासिक किल्ला पाहण्यासाठी पन्हाळा या ठिकाणी पोहोचली यावेळी पन्हाळगडाची माहिती गाईड कडून विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्यामध्ये त्याने पन्हाळगडावरील बांधकाम इमारतींची माहिती देत असताना सज्जा कोटी, बालेकिल्ल्यात अन्नधान्य साठा ठेवण्यासाठी गंगा, यमुना, सरस्वती ही तीन धान्य कोठारे , तीन दरवाजा, गडावरील विहिरी तसेच इतर वास्तूविषयी माहिती दिली.


 यानंतर अनेक पुरातन वास्तूंचे जतन करून ठेवलेले ऐतिहासिक वास्तु संग्रहालय असलेले शाहू पॅलेस पाहण्यात आले तेथून पुढे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी मूळ शक्ती पीठ असणारी कोल्हापूर येथील पुरातन मंदिरातील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन जवळच  सौंदर्याने नटलेला मनमोहक असा रंकाळा तलाव पाहिल्यानंतर रात्रीचे जेवण आटोपून शेवटी परतीच्या प्रवासात सुरुवात झाली रात्री 1 वाजता ही क्षेत्रभेट सुखरूपपणे न्यू इंग्लिश स्कूल ज्युनि.कॉलेज सांगोला या ठिकाणी पोहोचली. 


ही क्षेत्रभेट ज्युनि.कॉलेजचे प्राचार्य श्री. केशव माने,उपप्राचार्य प्रा. संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभाग प्रमुख प्रा. संतोष राजगुरू, प्रा.जयंतराव बंडगर, प्रा. सौ. जुलेखा मुलाणी यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

No comments:

Post a Comment